इथे आम्ही थालीपीठ रेसिपी मराठी दिली आहे.इथे आम्ही सर्वाना येईल अशी सोपी रेसिपी दिली आहे.या रेसिपी साठी वेगळे असे काही लागत नाही घरतील पदार्थ वापरून तुम्ही ही रेसिपी बनवू शकता.दिलेल्या स्टेप नुसार बनवा म्हणजे तुमचे थालीपीठ तयार होईल.

Thalipeeth Recipe in Marathi

थालीपीठ रेसिपी मराठी | Thalipeeth Recipe in Marathi

लागणारे साहित्य:

बेसनपीठ

१ चमचा ज्वारीचे पीठ

१ चमचा गव्हाचे पीठ

ओवा

धणे

जिरे

बारीक चिरलेली कोथिंबीर

बारीक चिरलेली लसूण

बारीक चिरलेली हिरव्या मिरच्या

हळद

हिंग

चवीनुसार मीठ

बनवण्याची प्रक्रिया :

१. एका भांडयात बेसनपीठ,ज्वारीचे पीठ,गव्हाचे पीठ एकत्रित करून घ्या लक्षात ठेवा गव्हाचे व ज्वारीचे पीठ फक्त एक चमचा घ्याचे आहे

२. एकत्र झाल्यावर त्यात हळूहळू पाणी घाला आणि त्या मध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर,लसूण हिरव्या मिरच्या पेस्ट, ओवा,धणे,जिरे,हळद,हिंग,चवीनुसार मीठ घालून कणिक करून घ्या

३. लक्षात घ्या कणिक कडक किंवा कोमलही असू नये.

४. ओला स्वच्छ नॅपकिन किंवा रुमाल घ्या तो भिजवा व पसरवा 

५. थोडी कणिक घ्या त्याचा छोटा बॉल तयार करा

६.आणि तो बॉल हाताचा सह्यांने त्या ओल्या कपड्यावर पसरून भाकरी सारखा गोल आकार करून घ्या हा गोल करताना आपला हात पाण्यात बुडवा आणि थालीपीठ पसरवा.

७.थालीपीठ गोल झाल्यावर त्यावर काही छिद्र करा.

८.मध्यम आचेवर तवा गरम करा.

९.त्यावर थोडेसे तेल पसरवा.

१०.ज्या कापडा वर थालीपीठ थापले आहे ते उचलून तव्या वर अलगत ठेवा 

११.थालीपीठावर आणि आजूबाजूला थोडे तेल घाला व दोन्ही बाजूने चांगले भाजून घ्या

१२.अशा प्रकारे तुमचे थालीपीठ तयार होईल

१३.आपल्याकडे दही किंवा लोणचे किंवा चटणीसह थालीपीठ असू शकते.



हे पण वाचा -

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने