Tarot Card in Marathi

या पोस्ट मध्ये आम्ही टॅरो कार्ड मराठी / Tarot Card in Marathi माहिती दिली आहे. इथे आम्ही टॅरो कार्डस म्हणजे काय, टॅरो कार्डस वापर, टॅरो कार्ड द्वार भविष्य पाहण्याची पद्धत या सगळ्याची माहिती या लेखात आम्ही दिली आहे.

टॅरो कार्डस म्हणजे काय / Tarot Card in Marathi :- 
टॅरो कार्डस म्हणजे कोणत्याही व्यक्तीच्या भुतकाळात, वर्तमानकाळात किंवा भविष्यकाळात ज्या गोष्टी घडल्या आणि ज्या गोष्टी घडणार आहेत हे पहायचे असेल तर ज्या ७८ कार्डचा वापर केला जातो त्याला टॅरो कार्ड असे म्हणतात. 

टॅरो कार्ड चा वापर सगळ्यात आधी युरोपात केला गेला टेराॅ कार्ड हे जीवानाची थेअरी वर आधारीत असतात.

जसे पृथ्वीची उत्पती झाल्यावर जी सजीव सृष्टी निर्माण झाली आणि जी काही तत्वे निर्माण झाली यावरून टॅरो कार्ड ची थिअरी काम करते. म्हणुन जीवनाची थेअरी शी टॅरो कार्ड ची थेअरी मिळती जुळती आहे.

टॅरो कार्डस चा वापर :-
हा एखाद्या व्यक्तीचा भुतकाळ, वर्तमानकाळ किंवा भविष्यकाळ पाहण्यासाठी केला जातो. जसे ज्योतिषशास्ञात भविष्य पाहण्यासाठी नाव, जन्मवेळ आणि जन्मतारिख लागते. तसेच टॅरो कार्ड द्वारे भविष्य पाहण्यासाठी फक्त अचुक प्रश्न विचारावा लागतो व त्या प्रश्नावरून तुम्हाला उत्तर मिळते. 

तसेच या टॅरो कार्ड मधुन तुम्हाला तुमचे भविष्य चिञ, अंक आणि शब्दावरून सांगितले जाते. तसेच या टॅरो कार्ड मधील एका कार्डचा अर्थ प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळा असु शकतो. प्रत्येक कार्डचा अर्थ व्यक्तीनुसार बदलत असतो. 

या टॅरो कार्ड द्वारे तुम्ही खालील प्रकारच्या प्रश्नाची उत्तरे मिळवु शकता जसे की आजचा दिवस कसा जाईल? मला पुढील एका वर्षात सरकारी नोकरी लागेल का? माझ्या कार्यालयातील वरीष्ठ अधिकारी कसे आहेत?. तसेच टॅरो कार्ड द्वारे यश-अपयश, नातेसंबध, पैसे, निवडेली दिशा, करिअर, परिक्षा यांची पण उत्तरे मिळवु शकता.

तसेच या टॅरो कार्ड भविष्य पद्धतीत तुमच्या अवचेतन मनाचा वापर करून उत्तरे मिळवली जातात. अवचेतन मन सर्वात शक्तीशाली असते म्हणुन वापर करतात.

टॅरो कार्डस ची माहिती :- 
टॅरो कार्डस मधे एकुन ७८ कार्डस असतात यावरून प्रत्येक व्यक्तीचे भविष्य सांगितले जाते. या ७८ पैकी २२ ही अतिशय महत्वाची कार्ड असतात आणि ५६ कार्ड ही कमी महत्वाची असतात. 

तसचे प्रत्येक कार्डवर एक चिञ छापलेले असते हे चिञ तुमच्या भविष्याची माहिती देते. जर तुमचा प्रश्न होय किंवा नाही मधे असेल तर तुम्हाला एका कार्डवरून उत्तर मिळते. 

जर तुमचा प्रश्न जरा मोठा असेल किंवा एका कार्डने तुमचे उत्तर नाही मिळाले तर दोन कार्डने तुमचे उत्तर मिळते आणि प्रश्न जर मोठा असेल तर तीन कार्डने तुमचे उत्तर दिले जाते. टॅरो कार्ड उचलतातना नेहमी डावा हात वापरतात कारण डावा हात आपल्या हृदयाला जोडलेला असतो म्हणुन डावा हात वापरतात.

टॅरो कार्डद्वारे भविष्य पाहण्यासाठी लागणार्या गोष्टी :-
ज्याला भविष्य पहायचे आहे तो व्यक्ती आणि त्याचा अचुक प्रश्न आणि ७८ टॅरो कार्ड एवढेच लागते. जर तुम्हाला स्वता:ला टॅरो कार्ड वाचता येत असतील तर तुम्ही स्वताः स्वताचे भविष्य पाहु शकता आणि जर तुम्हाला टॅरो कार्ड वाचता येत नसतील तर टॅरो कार्ड द्वारे भविष्य सांगणाराकडे जाऊन भविष्य पाहु शकता. 

टॅरो कार्ड द्वार भविष्य पाहण्याची पद्धत / Tarot Reading in Marathi :-
१. पहिल्यांदा प्रश्न विचारतात.
२. नंतर टॅरो कार्ड हातात घेतात आणि चांगले फिसतात किंवा शफल करतात.
३. त्यांनतर सर्व कार्ड हातात घेतात आणि डोळेबंद करून देवाचे नाव घेतात.
४. नंतर प्रश्न विचारणाराचे नाव घेऊन डावा हात वापरून टॅरो कार्डचे तीन भाग करून टेबलावर ठेवतात.
५. जर उत्तर होय किंवा नाही असेल तर एक कार्ड उचलतात.
६. जर प्रश्न मोठा असेल तर एक कार्ड उचल्यानंतर कार्ड टेबलवर पसरवतात आणि अजुन दोन कार्ड उचलुन भविष्य सांगितले जाते.


हे पण वाचा - 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने