Search Bar

माझी शाळा मराठी निबंध | My School Essay in Marathi - माहितीदर्शक

माझी शाळा मराठी निबंध

विद्यार्थी मित्रांनो आपण या लेखात आपण माझी शाळा मराठी निबंध पाहणार आहोत. तसेच हा माझी शाळा मराठी निबंध | My School Essay in Marathi आम्ही अतिशय सध्या आणि सरळ भाषेत लिहून दिला आहे. हा तुम्हला निबंध कसा वाटलं नक्की कळवा.

माझी शाळा विधेचे माहेर घर म्हणजे शाळा शाळेत आपल्याला खूप काही शिकता येते. शाळा हि ज्ञानाचे मंदिर म्हणून ओळखले जाते प्रत्येक विध्यार्थ्यांच्या आयुष्यात शाळा हि  महत्वाची भूमिका बजावत असते. प्रत्येक मूल हे शाळेतजाण्या पूर्वी अज्ञानी असते परंतु ते शाळॆत गेल्या वर सज्ञान होते ते केवळ शाळेमुळेच शाळेत आपल्याला खूप काही शिकायला मिळते. 

शाळा आपल्याला चांगला माणूस म्हणून जगायला शिकवते ती शाळा प्रत्येक मुलाच्या आयुष्यात शाळा हि खूप महत्वाची असते कारण शाळा हि त्या मुलाला भविष्यात कसे राहायचे ते शिकवत असते प्रत्येक मुलाचा आयुष्यात शाळेचे योगदान खूप महत्वाचे असते.

My School Essay in Marathi

माझ्या शाळेचे नाव श्री शिवाजी विधालय आहे माझा शाळेचा परिसर हा खूप सुंदर आहे माझा शाळे मध्ये १ते १२ पर्यंतचे वर्ग आहेत संगणकलॅब आहे मैदान,वाचनालय,लॅब्रोटरी,सभागृह आणि खूप झाडे आहेत माझा शाळा हि अतिशय सुंदर तिथे खूप मन रमते माझ्या शाळेत शिस्तीला फार महत्व दिले जाते प्रत्येक मुलाला शिस्तीचे महत्व पटावे व ते स्वयम शिस्त व्हावे या कडे फार लक्ष दिले जाते.

शाळेचा पहिला गजर होताच सर्व मुलं एकत्र जमतात व प्रार्थना करतात तेव्हा त्या ठिकाणचे वातावरण हे अतिशय आनंदी होते मुले तितक्याच उत्सहाने प्रार्थना म्हणतात माझा शाळेत अभ्यास बरोबर विविध जयंत्या आणि सण साजरे केले जाते. तसेच मुलांसाठी भाषण स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आश्या विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात. 

माझा शाळेत शिक्षक हि खूप छान आहेत ते सर्व मुलांना शिस्तीचे धडे शिकवतातच शिवाय ते सर्वाना मार्गदर्शन सुद्धा करतात ते अभ्यासा बरोबर स्पर्धा परीक्षांचे मार्ग दर्शन सुद्धा करतात व ते स्पर्धा परीक्षाची तयारी सुद्धा करून घेतात. आमच्या शाळेचे वाचनालय अतिशय सुंदर आहे तेथे विद्यार्थ्यंचे खूप मन रमते तेथे सर्व प्रकारची पुस्तके मुलांना वाचनासाठी उपलब्ध आहेत माझ्या शाळेत अभ्यासा बरोबर खेळालाही खूप महत्व दिले जाते.

आमचा शाळेत खो-खो, कबड्डी, हॉलीबॉल असे अनेक खेळाचे प्रशिक्षण दिले जाते. त्यातून आमच्या शाळेतील काही विद्यार्थी राज्यस्तरीय स्पर्धेत जाऊन आलेत. लवकरच राष्ट्रीय स्पर्धेत खेळाडू पाठवायचा शाळेचा मानस आहे. त्याच बरोबर मुलांना दिवाळीच्या व उन्हाळयाच्या सुट्टीत विविध शिबिरांचे आयोजन केले जाते व त्या द्वारे खेळाचे व्यायामाचे व इतर महत्वाच्या विषयाचे महत्व शिकवले जाते.

माझा शाळेची सहल हि दर वर्षी काढली जाते त्या मध्ये प्रत्येक विध्यार्थी सामील होऊन खूप धमाल करतो.  माझ्या शाळेचे महत्वाचे म्हणजे १० वी चा निकाल हा खूप चांगला लागतो त्या मध्ये अतिशय चांगल्या मार्कानी अनेक विध्यार्थी पास होतात व गुणवंत विध्यार्थीचे कौतुक हि केले जाते अशी आहे.

शाळेचे मैदान

माझी शाळा हि प्रत्येक मुलावर उत्तम संस्कार करते माझे दुसरे घर मला माझी शाळा वाटते माझ्या शाळेत मला खूप सारे चांगले मित्र मिळाले हे माझे खूप मोठे भाग्य समजतो मी माझ्या शाळेचा आदर करतो मला माझ्या शाळेचा खूप अभिमान आहे म्हणून माझी शाळा मला फार आवडते.

माझी शाळा ग्रामीण भागात'असली तरी आम्ही खूप वेगाने आत्याधुनिक पद्धती वापरात आणण्याचा प्रयत्न करत आहोत आमचा मुख्याध्यापकांनी गेल्याच  आठवड्यात सांगितले कि सर्व विषय हे ऑनलाईन शिकवले जाणार आहेत व ते प्रोजेक्टर वर शिकवले जाणार आहेत त्या शाळेने प्रोजेक्टर सुधा खरेदी केले मला अशा शाळेचा भाग होता आले हे माझे सौभाग्य समजतो व आमचे भविष्य सुंदर व कार्यक्षम बनवत राहो व चांगले विद्यार्थी घडवत राहो. 

अशी हि माझी शाळा पण करोना आल्या पासून ती बंद आहे. शाळेच्या मैदानावर आता गवत उगवले आहे वर्षभरापासून तिथे विद्यार्थीच गेले नाहीत खेळले नाहीत मैदान सुद्धा त्यांची वाट पाहताय पण करोनामुळे सगळे बंद आहे. पण आता लस आली आहे आणि आता लवकरच सर्व ठीक होईल आणि शाळा आधी सारखी विध्यार्थ्यानी भरून जाईल.


हे पण वाचा - 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या