Bhrashtachar Essay in Marathi

विद्यार्थी मिंत्रानो आज आपण भ्रष्टाचार निबंध मराठी / Bhrashtachar Essay in Marathi हा निबंध पाहणार आहोत. आम्ही भ्रष्टाचार निबंध मराठी अत्यंत सध्या आणि सहज समजेल अश्या भाषेत दिला आहे जेणे करून तुम्हला लगेच समजेल. 

भारत हा दिवसेन दिवस एक समृद्ध राष्ट्र बनण्याकडे वाटचाल करत आहे परंतु आजही आपल्या समोर खूप मोठ्या समस्या आहेत वाढती लोकसंख्या,बेरोजगारी व भ्रष्टाचार हि आपल्या समोरची सर्वात मोठी आव्हाने आहेत.

अगदी सरकारी शिपाया पासून ते मोठं मोठया राजकीय नेत्या पर्यंत सगळेच भ्रष्टाचाराला खात पाणी घालत असतात आज भारतात कुठे कसलेही काम असेल तर आधी चिरीमिरी दिल्याशिवाय आपले काम होत नाही आणि महत्वाचे म्हणजे कुणालाच त्यात काही वावघे वाटत नाही.

पण काळत नकळत आपणच भ्रष्टाचाराला बढावा देत असतो भ्रष्टाचाराची सुरुवात कुठून झाली हे कुणीही सांगू शकत नाही पण हे खरं आहे की जसजसा माणसाकडे पैसे येऊ लागला तसा माणूस चैनीचा व दिखाव्याचा गोष्टींकडे आकर्षित होऊ लागला व त्याच्या गरजा वाढायला लागल्या व त्याला पैसा कमी पडू लागला त्यामुळे माणूस हा भ्रष्टाचाराकडे वळू लागला.

जसजशी सुधारणा होऊ लागल्या तशा चैनीचा वस्तू उपलब्ध होऊ लागल्या व गरज नसतानाही त्या हव्या हव्याशा वाटू लागल्या माणसाला लोभ वाढू लागला जास्त मेहनत न करता अधिक अधिक संपत्ती मिळवायचा लोभ वाढू लागला हि हावच मूळ म्हणजे भ्रष्टाचार आहे.

आपल्या पदाचा अधिकाराचा गैर वापर करून कमीत कमी वेळात जास्तीत जास्त श्रीमंत होण्याचा त्या मागचा मानस असतो सामान्य माणूस सुद्धा त्यामागचा तेवढाच गुन्हेगार असतो सामान्य माणूस लाच देतो म्हणूनच समोरचा माणूस घेतो किती सहज आपण तो गुन्हा करतो.

किती वेळा आपण पाहतो कि आपल्याला नाक्या वर पोलीस पकडतात तेव्हा आपण सर्वजण त्याच्या हातावर पन्नास शंभर रुपये टेकवून आपण निघून जातो सरकारी नोकरीच्या ठिकाणी तर लाखोंची लाच दिली जाते शाळेत कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळवण्यासाठी लाच दिली जाते.

एवढच नव्हे तर आपण देवळात सुद्धा लवकर दर्शन व्हावे म्हणून पुजाऱ्याला पैसे देतो पटत असेल का हे देवाला किती वेळा आपण पैसे देऊन उच्च पद मिळवतो निवडणुकांमध्ये पैसे वाटून मत विकत घेतली जातात नंतर जेव्हा असे लोक निवडून येतात तेव्हा कित्येक पटीने हि लोक पैसे आपले वसूल करतात.

आपले प्रत्येक काम करताना त्यांना पैसे द्यावे लागतात का हे आपल्याला आधी कळत नाही आपण डोळ्या वर बक्षिसांची पट्टी बांधून गप्प राहतो आणि आपण कोणालाही निवडून देतो आणि भारतातल्या सिस्टिमला नावे ठेवत बसतो आपण आपली चूक हि कधीच मान्य का करत नाही.

भ्रष्टाचार निबंध मराठी

आपण सर्वांना कळायला पाहिजे कि भ्रष्टाचार करून पुढे जाता येईल पण अशी भ्र्रष्टाचार केलेली संपत्ती काही कामाची नाही या उलट इमानदारीने कमावलेले खूप कामाचे असतात व त्याच्यात खूप समाधान सुद्धा असते आपल्या सर्वाना हे काळात असेलही आपण कधी ना कधी भ्रष्टाचाराला खत पाणी घातले असेल कधी कधी तर असे होते कि आपल्यामुळे एकदा इमानदार अधिकाऱ्याला लाच घ्यायची सवय लागून जाते आणि तो या चक्रविव्हात अडकतो आणि त्याला पुढे त्याचा नफा दिसू लागतो.

आपल्या भारताची प्रगती व्हावी असे वाटत असेल तर सर्वानी प्रतिज्ञा करायला हवी मला कितीहि त्रास झाला कामाला कितीहि वेळ लागला तरी मी भ्रष्टाचार करणार नाही आणि कुणाला करूही देणार नाही.

पण आता थोडेसे चित्र बदलताना दिसत आहे कारण भ्रष्टाचारामुळे लोकप्रतिनिधी पासून सर्वसामान्य माणसापर्यंत नुकसान होत आहे हे लोकांना कळले आहे. आजकाल विद्यार्थी सुद्धा परीक्षेत होणारा भ्रष्टाचारा उघडकीस आणत आहेत. तसेच सरकार पण यावर कारवाही करते आहे पण त्याला वेळ लागतोय. तसेच अनेक चित्रपटातून भ्रष्टाचाराची जनजागृती होताना दिसते. 

पण हे पुरेसे नाही आता कुठे सुरुवात आहे आपल्याला या चळवळीला खूप पुढे न्यायाचे आहे. कारण आता सुरु होऊ पाहणारी हि चळवळ बंद होता काम नये आणि जास्तीत जास्त लोकांनी या चळवळीत भाग घेऊन भ्रष्टाचारा संपवण्यासाठी प्रयत्न केले तर भारतातून लवकरच भ्रष्टाचाराचा राक्षस नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही.


हे पण वाचा - 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने