Tuljabhavani Aarti


आम्ही इथे तुळजाभवानी आरती/Tuljabhavani Aarti देत आहोत आम्ही इथे पुर्ण तुळजाभवानी आरती दिली आहे तसेच इतर महत्वाच्या आरत्या पण आम्ही खाली दिल्या आहेत 

श्री तुळजाभवानी आरती । श्री अंबाबाई आरती 

जय जय मायभवानी अंबा तुळजापुरवासिनी हो ।
चित्शक्ति श्रीदुर्गा भैरवि अघतमविनाशनी हो ॥धृ०॥
कृतयुगाचे ठायिं दैत्य म्हैसासुर प्रगटला हो ।
त्याच्या त्रासाभेणें मोठा हाहा:कार उठला हो ॥१॥
जय जय मायभवानी अंबा तुळजापुरवासिनी हो ।
चित्शक्ति श्रीदुर्गा भैरवि अघतमविनाशनी हो ॥धृ०॥

गाईच्या रूपानें पृथ्वी ब्रह्माचें जाउन हो ।
होती जालि कष्टि अपुलें गार्‍हाणें सांगुन हो ॥
तेव्हां हरिहरव्रह्मा आले तुजलागीं शरण हो ॥२॥
जय जय मायभवानी अंबा तुळजापुरवासिनी हो ।
चित्शक्ति श्रीदुर्गा भैरवि अघतमविनाशनी हो ॥धृ०॥

वंदुनिया स्तुतिस्तवनें अंबे करिति तव विनवणी ।
रक्षी विश्वजगातें ह्मणवुनि लागति ते चरणीं हो ।
अभयवरातेम देउनि सुरवर पाठविले ते क्षणीं हो ॥३॥
जय जय मायभवानी अंबा तुळजापुरवासिनी हो ।
चित्शक्ति श्रीदुर्गा भैरवि अघतमविनाशनी हो ॥धृ०॥

नाना अयुधें सेवुनि धरिला अष्टभुजा अवतार हो ।
अउट कोटि चामुंडा घेऊनि सांगातें हो ।
सिंहारुढ होउनिया केला दैत्यांचा संहार हो
हेल्याच्या रूपानें पळतां जाला ह्मैसासुर हो ।
ते काळीं शस्त्रानें उडवुनि दिधलें त्याचें शिर हो
जयजयकारें सुरवर करिति निरंजन परिकर हो ॥४॥
जय जय मायभवानी अंबा तुळजापुरवासिनी हो ।
चित्शक्ति श्रीदुर्गा भैरवि अघतमविनाशनी हो ॥धृ०॥


हे पण वाचा - 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने