रामाची आरती | Ram Aarti in Marathi | Shri Ramachi Aarati

रामाची आरती | Ram Aarti in Marathi | Shri Ramachi Aarati

उत्कट साधुनी शिळा सेतू बांधोनी ।
लिंगदेह लंकापुरी विध्वंसूनी ।
कामक्रोधादिक राक्षस मर्दूनी ।
देह अहंभाव रावण निवटोनी ।। १ ।।
जय देव जय देव निजबोधा रामा ।
परमार्थे आरती, सद्भावे आरती,परिपूर्णकामा ।। धृ० ।।

प्रथम सीताशोधा हनुमंत गेला ।
लंका दहन करुनी अखया मारिला ।
मारिला जंबुमाळी भुवनी त्राहाटिला ।
आनंदाची गुढी घेऊनिया आला ।। २ ।।
जय देव जय देव निजबोधा रामा ।
परमार्थे आरती, सद्भावे आरती,परिपूर्णकामा ।। धृ० ।।

निजबळे निजशक्ति सोडविली सीता ।
म्हणुनी येणे झाले अयोध्ये रघुनाथा ।
आनंदे ओसंडे वैराग्य भरता ।
आरती घेऊनी आली कौसल्यामाता ।। ३ ।।
जय देव जय देव निजबोधा रामा ।
परमार्थे आरती, सद्भावे आरती,परिपूर्णकामा ।। धृ० ।।

अनाहतध्वनि गर्जती अपार ।
अठरा पद्मे वानर करिती भुभुःकार ।
अयोध्येसी आले दशरथकुमार ।
नगरीं होत आहे आनंद थोर ।। ४ ।।
जय देव जय देव निजबोधा रामा ।
परमार्थे आरती, सद्भावे आरती,परिपूर्णकामा ।। धृ० ।।

सहजसिंहासनी राजा रघुवीर ।
सोऽहंभावे तया पूजा उपचार ।
सहजांची आरती वाद्यांचा गजर ।
माधवदास स्वामी आठव ना विसर ।। ५ ।।
जय देव जय देव निजबोधा रामा ।
परमार्थे आरती, सद्भावे आरती,परिपूर्णकामा ।। धृ० ।।

हे पण वाचा – 

Mahadevachi Aarti | महादेवाची आरती | शंकराची आरती

श्री विठ्ठलाची आरती | पांडुरंगाची आरती

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. हा लेख वाचण्यासाठी खूप खूप आभारी आहे. माझे नाव प्राची पाटील आहे. माहितीदर्शक ही वेबसाइट संपूर्णपणे मराठीमध्ये आपल्या सेवेमध्ये मी तयार केली आहे. या वेबसाइट वरती तुम्हाला शैक्षणिक, आर्थिक, तंत्रज्ञान यांसोबत रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी मराठी माहिती आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. जर तुम्हाला आमच्या वेबसाइट वरील कुठल्याही मजकुरामध्ये काही चुकीचे अथवा गैर वाटत असेत तर आमच्याशी संपर्क करा.

Leave a Comment