Search Bar

सातबारा बघणे | 7 12 कसा शोधायचा | 7/12 Kasa Pahava | सातबारा उतारा शोधा

या लेखामधे आपण आज आपण आपल्या लॅपटॉप वर सातबारा बघणे शिकणार आहोत तसेच  ऑनलाईन 7 12 कसा शोधायचा हे पाहणार आहोत आणि मोबाईलवर 7/12 कसा पाहावा | 7/12 Kasa Pahava  हे पण शिकणार आहोत तसेच तो सातबारा आपल्या मोबाईल किंवा कॉम्पुटर मधे कसा डाऊनलोड करायचा याची संपुर्ण माहिती घेणार आहोत. तसेच आपण ऑनलाईन सातबारा उतारा शोधणार आहोत.

सर्वात आधी मोबाईल किवा कॉम्पुटरवर गुगल उघडा गुगल उघडण्यासाठी तुम्हाला इंटरनेट ची गरज पडेल. नंतर गुगलमधे '7/12 Extract' असे टाईप करा.सर्च मध्ये जी पहिली वेबसाईट दिसेल त्यावर क्लीक करा.

सर्च रिझल्ट मधे सर्वात वरती '7/12 Exact' असे लिहलेले दिसेल त्यावरती क्लिक करा आणि वेबसाइट उघडे पर्यत थांबा त्यानंतर तुम्हाला भुलेख महाभूमीची विबसाईट दिसू लागेल.संदर्भासाठी खालील फोटो पहा.सातबारा बघणे
Image Credit- bhulekh.mahabhumi.gov.in

त्यानंतर ज्या विभागामधील सातबारा पाहायचा आहे किंवा तुमचा विभाग निवडा आणि "Go"लिहलेल्या बटनावर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला तुमच्या विभागाचे नाव दिसेल व त्यांनतर ७/१२ व ८ अ दिसेल.

या लेखात आपण ७/१२ व ८अ हे दोन्ही उतारे बघण्याची प्रक्रिया बघणार आहोत प्रथम आपण ७/१२ बघण्याची प्रक्रीया पाहू.

ऑनलाइन सातबारा बघणे किंवा ७/ १२ पाहण्यासाठी  -

सर्व प्रथम ७/१२ वरती क्लिक करा त्यानंतर जिल्हा निवडा त्यानंतर तुमचा तालुका निवडा आणि त्यानंतर गाव निवडा,त्यांनतर तुम्हाला सर्वेनंबर,गट नंबर, अक्षरी सर्वेनंबर/गटनंबर,पहिले नाव,मधले नाव, आडनाव,संपुर्ण नाव असे पर्याय दिसतील, यापैकी जे उपलब्ध असेल ते तुम्ही निवडा म्हणजे त्यावर क्लिक करा इथे मी आडनाव निवडले आहे.

त्यानंतर खाली दिलेल्या जागेत आडनात टाका ते मराठी किवा इंग्रजीमधे टाकले तरी चालेल आडनाव टाकल्यानंतर पुढे शोधा असे येईल त्यानंतर शोधावर क्लिक करा त्यानंतर खाली नावाची लिष्ट येईल त्यात तुम्हाला ज्याचा सातबारा बघायचा आहे त्याचे नाव निवडा आणि त्यावर क्लिक करा.

त्यानंतर खाली मोबाईल नंबर टाकल्यावर ७/१२ पहा असे दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर 'Please verify' असे दिसेल तिथे Captcha (कॅपचा) दिसेल तो जसाच्या तसा टाका

डाव्या बाजूला जी आक्षरे दिसत आहेत ती टाका आणि 'verify Captcha to view 7/12' वरती क्लिक केल्यानंतर साताबारा उतारा ऑनलाईन उघडेल.

८अ उतारा पाहण्यासाठी - 

तुम्हाला ज्या विभागातील ८ अ पहायचा आहे तो किंवा तुमचा विभाग निवडा आणि त्यावर क्लिक करा आणि त्यांनतर तुमचा विभाग दिसेल तुमच्या विभागाच्या नावाखाली ७/१२ व ८अ असे लिहलेले दिसेल त्यापैकी ८ अ निवडा आणि पुढची प्रक्रिया सातबारा पाहण्यासाठी जसी केली तसी करा.ही प्रक्रिया वरती दिली आहे.

७|१२ व ८अ उतारा मोबईल व कॉम्पुटर मधे मधे कसा सेव्ह करायचा-

सातबारा उतारा उडल्यानंतर जर तुम्ही मोबाइल वर असाल तर शक्यतो ही वेबसाईट गुगल क्रोम मधेच उघडा.

डिजिटल सातबारा मोबाईल मधे सेव्ह करण्यासाठी- 

सर्वप्रथम सात बाराची वेबसाईट गुगल क्रोम मधे उघडा गुगल क्रोम नसेल तर गुगल प्ले स्टोर मधुन डाऊनलोड करा.

त्यांनतर महाभुलेख च्या वेबसाइट वर जाऊन सातबारा उघडा सातबारा उघडल्यावर उजव्या कोपऱ्यात वरच्या बाजुला 3 डाॅट आहेत.

त्यावर क्लिक करा आणि त्यामधे क्लिक केल्यावर share वरती क्लिक करा व त्यानंतर 'print' च्या पर्याया वरती क्लिक करा त्यानंतर डाऊनलोड च्या चिन्हा वरती क्लिक करा.

त्यांनतर जिथे सातबारा सेव्ह करायाचा आहे तो फोल्डर निवडा आणि print  वर क्लिक करा PDF फाईल तुमच्या मोबाइल मधे सेव्ह होईल.

सातबारा कॉम्पूटर मधे सेव्ह करण्यासाठी -

सातबारा उघडल्यानंतर किबोर्ड वरती का 'Ctrl+p' दाबा आणि त्यानंतर 'Destination' मधे 'Save as PDF' आले आहे का पहा नसेल आले तर 'Save As PDF' निवडा आणि सेव्ह वरती क्लिक करा. 

त्यानंतर जिथे सेव्ह करायचे आहे तो फोल्डर निवडा आणि 'Save' वरती क्लिक करा म्हणजे सातबारा काॅम्पुटर मधे सेव्ह होइल.संदर्भासाठी खालील फोटो पहा.

वर दिलेल्या प्रोसेस नुसार तुम्ही ७|१२ व ८ अ तुमच्या मोबाइल व काॅम्पुटर मधे सेव्ह करू शकता.जर तुम्हाला डाऊनलोड करताना काही आडचण येत असेल तर खाली कमेंट करा आम्ही त्याचे उत्तर नक्की देऊ.

महाभूलेखा ची अधिकृत वेबसाइट - https://bhulekh.mahabhumi.gov.in/


हे पण वाचा-

महावितरण बिल कॉपी | महावितरण बिल चेक करणे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या