Search Bar

मराठी कोडे | मराठी कोडी व उत्तरे

मराठी कोडी व उत्तरे
     

काही निवडक मराठी कोडी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहेत या मराठी कोड्यामधील किती मराठी कोडी तुम्ही सोडवलीत आम्हाला नक्की कळवा.सर्व कोड्याची उत्तरे शेवटी दिली आहेत.

1.नका जोडु मला इंजीनलागत नाही मला इंधन
मारा पाय भरभर धावते मीसरसर ओळखा पाहु मी कोन?

2.हिरवी पेटी काट्यात पडलीउघडून पाहिली तर मोत्याने भरली.

3.तुमची अशी कोणती गोष्ट आहे जी बाकी लोक जास्त वापरतात.
4.सात अक्षरी ना काना, मात्रा, नी वेलांटी असा जिल्हा कोणता?


5.अशी कोणती वस्तु आहे जी खाण्यासाठी घेतो पण खात नाही.

6.दोन बैल होते एक मेला एक विकला किती राहिले?

7.मी सर्व वस्तुंना उलटे करु शकतो

पण स्वताला मी हलवु ही शकत नाही,
ओळखा पाहु मी कोण?

8.रोजच असतो तुमच्या घरी मी,पण काही जणानांच आवडतो,
ञास मला देता तुम्ही पण,अश्रुंचा पुर तुमच्याच डोळयात येतो,
ओळखा पाहू मी कोण.

9.तो कोण ज्याला आपण दिवसा पाहु शकतो,
पण रात्री कधीच पाहु शकत नाही.

10.उन्हाळयात तुम्ही मला घाबरता,

पण हिवाळयात मलाच खाता,
पावसाळयात माझ्यामुळे दिसते,
तुम्हाला एक इन्द्रधनुष्य,
ओळखा मी कोण?

11.दिवसा ढवळया मक्काम करूनीबाहेर पडतो रातीला,
असा कोणता फिरे प्रवासीदिवा बांधुन पाठीला.

12.गळा आहे,पण डोकं नाही,खांदा आहे पण हात नाहीत सांगा मी कोण.

13.एवढसं कार्ट घर कसं राखतं.

14.दोन भाऊ शेजारी भेटनाही जान्मांतरी.

15.चार खंडाचा एक शहर,

चार विहरी बिना पानी 18 चोर त्या शहरी,
एक राणी आला एक शिपाई
सगळ्यांना मारून मारूत विहरीत टाकी....!!
सांगा मी कोण?

16.आधी लाल लाल मग गोल गोल मग थंयागथताळांग  सांगा मी कोण?

17.कपीली गाय तिला लोंखडी पायराजा बोंबलत जाय पण थांबत नाय. 

18.वेडा नाही पण कागद फाडतो,

पोलिस नाही पण खाकी कपडे घालतो,
देऊळ नाही पण घंटा वाजवतोओळखा मी कोण?

19.एकदा का बापाने मुलाल एक वस्तु दिली आणि 

सांगितले भुक लागली तर खा,
तहान लागली तर पी आणि थंडी वाजली तर जाळ 
सांगा पाहु ती वस्तु कोणती?

20.अशी कोणती वस्तु आहे की जी ओढल तितकी छोटी होत जाते.

21.एक पाच अक्षरी पदार्थपहिले 3 अक्षरे एका फुलाचे नाव
शेवटचे आणि 4 थे अक्षर मौजपहिले दुसरे आणि शेवटचे अक्षर नोकर. 

22.मी तुमच्या शरिराचा एक भाग आहे
तुम्ही मला तुमच्या डाव्या हातात पकडु शकता
पण उजव्या हातात नाहीओळखा पाहु मी कोण?

23.गावभर हिंडतो पण देवळात जायला घाबरतोओळखा पाहु मी कोण?

24.एक जन वाढायला 12 जण जेवायला.


कोड्यांची उत्तरे -1)सायकल  2)भेंडी  3)नाव  4)अहमदनगर  5)ताट
6)फसवा प्रश्न उत्तर एक किंवा शून्य  7)आरसा  8)कांदा  9)सुर्य
10)ऊन  11)काजवा 12)मांडणी/आडणी  13)कुलूप  14)डोळा
15)कॅरम  16)उखळ-ठोंबा मिरच्या  17)रेल्वे  18)वाहक  19)नारळ  20)रबर  21)गुलाबजाम  22)उजवा कोपरा  23)चप्पल  24)घड्याळहे पण वाचा-

मराठी स्टेटस | मराठी स्टेटस मैत्री.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या