Search Bar

मराठी जोक्स | मराठी विनोद | Marathi Jokes - माहितीदर्शक

तुमच्या साठी काही निवडक मराठी जोक्स घेउन येत आहोत त्या पैकी तुम्हाला कुठले मराठी जोक्स आवडले नक्की कमेंट करूण सांगा.


मराठी जोक्स

पुण्यात आलेला नवीन माणुस
आहो ते सूसन हॉस्पिटलला कस जायचं
पुणेकर ये असा रस्त्याच्या मधोमध उभा रहा.

मास्तर - व्हाटसअप मुळे काय फायदा झाला 
बंड्या- मावा तोंडात असताना पण बोलता येतं 
खरं उत्तर दिल तरी चप्पल तुटे पर्यंत मारलं.

कोणीही माझ्यावर जोक्स तयार करू नाका
नाहीतर मी इंटरनेटच डिलीट करून टाकीन
                                आपलाच रजनीकांत.

स्थळ पुणे 
एक मुलगा सायकलवरुन जाताना एका मुलीला धडकला
मुलगी - बावळट ब्रेक नाही का मारता येत 
मुलगा (पुणेरी उत्तर)- अख्खी सायकल मारली
आता ब्रेक वेगळा काढुन मारु का?

गुरुजी - काय रे वर्गात डुलक्या देतोयस?
विद्यार्थी - नाही गुरुजी गुरुत्वाकर्षाने डोके खाली पडतय 
गुरुजी पृथ्वी सोडून गेले.

ग्रह मंगळ
पृथ्वीपासुन २२५ लाख किलोमीटर 
ग्रहाचा कामधंदा फक्त भारतीय लोकांचे लग्न मोडणे.

बंडयाचा बाप- त्याला सांगत असतो
कितीही झाल तरी मलापेक्षा बापच हुशार असतो 
बंड्या- अच्छा मग सांगा बरं फोनचा शोध कुणी
लावला?
बाप - ग्राहम बेलन 
बंड्या- मग त्याच्या बापाने का नाही लावला 
१५ दिवस झाले बाप अजुन पोराला मारतोय.

पत्नी - आपण लपाछपी खळुया 
मी लपते आणि तुम्ही मला शोधायच जर मी सापडले तर आपण शॉपिंग ला जायचं
आज दोन दिवस झाले बायको स्वतः नव-याला इकडे तिकडे शोधत फिरतेय.

इंजिनिअरींग कॉलेज मधे तोंडी परिक्षा चालु असते, 
पहिला मुलगा आत जातो 
शिक्षक - तु रेल्वेने जातोय आणि तुला
गरम व्हायला लागले तर तू काय करशीला 
विद्यार्थी - मी पंखा लावीन
शिक्षक - जर पंखा बंद आहे आणि तुला अजुन गरम व्हायला लागले तर 
विद्यार्थी- मी खिडकी उघडले
शिक्षक-  उत्तम आता मला सांग रेल्वे ८० कि मी  प्रति तासाने जात आहे तसेच खिडकीची लांबी आणि रुंदी २×२ आहे 
तर डबा थंड होण्यासाठी किती वेळ लागेल
विद्यार्थीला उत्तर येत नाही व त्याला बाहेर जायला सांगतात
दुसरा विद्यार्थी येतो
शिक्षक - तु रेल्वेने जातोय आणि तुला
गरम व्हायला लागले तर तू काय करशीला 
दुसरा विद्यार्थी - मी पंखा लावीन
शिक्षक - जर पंखा बंद आहे आणि तुला अजुन गरम व्हायला लागले तर
दुसरा विद्यार्थी- मी शर्ट काढीण
शिक्षक- तरीपण तुला गरम होतय उकाडा खुप आहे
दुसरा विद्यार्थी- मी पॅन्ट पण काढेण
शिक्षक- तरीपण तुला गरम होतय उकडुन मरेल इतकी गरमी आहे
दुसरा विद्यार्थी- मी उकडुन मेलो तरी चालेल पण खिडकी नाही उघडणार.

काही लोक इतकी रिकामटेकडी आसतात की 
कस्टमर केअर चा आलेला कॉल उचलुन पुर्ण आॅफर ऐकत बसतात.


मराठी विनोद

आज काल वाढलेल्या ढेरीचा उपयोग 
मोबाइल पुसण्याकरिता केला जातो.

जपान 7G सुरु करणार आणि आमच्या ईथ गच्चीवर 4G
गल्लीत H+, हॉल मध्ये E,बेडरुम मधे Emergency call only आणि 
चादर अंगावर घेतल्यावर डायरेक्ट Insert सिम.

मिठाईच्या दुकानाची पुणेरी पाटी
बहुमत सिद्ध झाल्याशीवाय पेढ्यांची ऑर्डर 
स्विकारली जाणार नाही म्हणजे नाही..

आजकाल सिंगल मूली शोधणे म्हणजे  
२१व्या शतकात डायनासोर शोधण्यासारखे आहे.

प्रश्न- सर्वात सुंदर कोन पत्नी की बहीण 
गण्याचं- ह्रदयस्पर्शी उत्तर पत्नीची बहीण.

रजनीकांत- हेलो मी रजनीकांत बोलतोय 
मुलगा- हो मला माहित आहे बोला 
रजनीकांत- तुला कसं कळलं बे मी काॅल केला म्हणुन
मुलगा- मोबाइल स्विच ऑफ होता.

कांदे महाग आहे ठीक आहे
पण जर फेअर ॲण्ड लव्हली महाग झाली ना
अर्धा भारत वेस्ट इंडीज बनुन फिरेल.

रजनीकांतने एकदा भारतात बसुन पाकीस्तानातला आतिरेकी मारला
कसा?- मोबाईल वरून Bluetooth ने.

पाण्यामुळे लोंखड गंजने,थंडीमुळे सर्दी होणे
वार्यामुळे झाडाची पाने हालने आणि मुलीमुळे
भिकारी होणे हा निसर्गाचा नियम आहे.

तुम्ही सुद्धा या जगात माण वर करून जगु शकता
फक्त मोबाइल घरी विसरून यायला पाहिजे.

भारतातील सर्वात मोठी आफवा- गाव सोड तुझी प्रगती होइल
याच नादात आमचे सर्व मिञ पुण्यात गेले अन् बाकीचे पिण्यात गेले.

डाॅक्टर - बाई तुमच्या नवर्याच्या सगळ्या टेस्ट करून झाल्यात 
पण सगळेच रिपोर्ट नाॅरमल आहेत 
काही कळतच नाही नेमक काय झालय ते
बाई(काळजीच्या सुरात)- आहो मग ते पोस्ट मार्टम का काय असत 
ते तरी करून बघा.

जीवनात नेहमी झाडु मारणारेच पुढे जातात
कारण फरशी पुसणारांना मागेच जाताना पाहिलय.

नवरा - या व्हॅलनटाइन डे ला काय गिफ्ट देऊ 
बायको - मला एक रिंग दया 
नवरा - लॅडलाईन वरुन का मोबाईल वरून.

आज बँकेचा कॅशिअर गणु बेशुद्ध होता होता राहिल
जेव्हा ४-५ तास लाईनमधे उभे राहून एक बाई दोन हजाराची नोट बघुन म्हणाली
'गणु साहेब याच्यात आणखी कलर्स दाखवा'.

एक मुलगा एका मुलीच्या मागे हात धुऊन लागला होता. 
मुलगी कंटाळून त्याला तोंड धुवुन दाखवते.
.....गोष्ट संपली.

गुरुजी - गण्या 52 गावांची नावे सांग 
गण्या - चाळीसगाव आणि बारामती 
गुरुजी राजीनामा देऊन वनवासाला गेले .

ताजमहाल तर आम्ही पण बनवला आसता पण वाळु मिळेणा म्हणून गप्प बसलोय.

लग्नात मुलाच्या बुटाऐवजी 
त्याचा मोबाईल चोरा ५००० च्या जागी ५०,००० पण भेटतील.

मी- मला लग्न करायच आहे 
घरचे- तुला भाजीसोबत कोणी कोथिंबिर देत
नाही पोरगी कोण देणार.

मुलगी- माझ्या पोटात तूझ्या प्रेमाची निशाणी आहे
मुलगा- पण मी तर अस काहीच केल नाही..! 
मुलगी- अरे तु दुपारी समोसा दिला होता ना
तो मी आत्ता खाल्ला 
मुलगा- तुझ्या आयची निट सांगत जा ना
फाटली ना माझी.

जिथे सत्य कामाला येत नाही 
तिथे स्क्रिनशॉट कामाला येतो.

गणु-डॉक्टर माझ्या स्वप्नात उंदीर फुटबाॅल खेळतात
डॉक्टर - हया गोळया रोज घ्या,तुमचा त्रास बंद होईल 
गणु - डॉक्टर गोळया परवा पासुन घेतल्या तर चालतील का?
डॉक्टर - का?
गणु - उद्या उंदरांची फुटबॉल ची फायनल मॅच आहे.

स्थळ - शाळेचा वर्ग
वेळ - इंग्रजीचा तास
मास्तर - गण्या सांग Shall कधी वापरतात
गण्या - थंडीत

एका गावात तर हद्दच झाली
जेव्हा एक बाई भर सभेत म्हणाली 
मला संडास आलं होत 
पण सरपंचान खाल्ल.

संतुर साबणाच्या एॅडमधे लहाण मुलीची
मम्मीच का दाखवतात पण पप्पा कधी नाही दाखवत 
का ते निरमा लावतात का?

ज्या मुली जास्त भाव खातात 
त्या लग्नानंतर एखादया टकल्यासोबत वडापाव खातात .

स्वःताच पोरग बरोजगार हिंडतय आणि जावई सरकारी नोकरी वाला पाहिजे.

आज कालची छोटी छोटी मुलं फाडफाट इंग्रजी बोलतात आणि 
एक आम्ही होतो 'I Love You'  ला 'आयला ब्यु' म्हणायचो.

पती- माझ्यासाठी लांबुन लांबुन लग्नासाठी मागण्या येत होत्या 
पत्नी - बरोबर आहे जवळ राहणार्यानां तुमचे कांड माहित असतील.

काही पोरींची सारखी तक्रार असते
अर्धच डोकं दुखतय 
त्यांना आता कोण सांगणार जेवढ आहे तेवढच दुखणार

वेळ राञीची जेवणात कारल्याची भाजी बघुन अशी चिड आली 
तेवढ्यात बायको म्हणाली
मी ३१ डिंसेबर ला माहेरी जाणार आहे
आईशप्पथ कारल्याची भाजी पनीर समजुण खाल्ली

आगोदर मला क्लास मधलं काय कळत नव्हतं 
मग मी टॉपर सोबत राहायला लागलो 
आता त्याला काय कळत नाय 

स्थळ अर्थाथच पणे
कोलगेट वाला पुणेकर ला "क्या आपके टुथपेस्ट मे नमक है"
पुणेकर- नाही मी वरुन टाकतो चवीनुसार थोडा थोडा
कोलगेट वाल्याने थोबाडीत मारून घेतली. 

बायको बराच वेळ सेल्फी काढत होती 
आणि चांगली आली नाही म्हणून कॅमेरा पुसत होती आणि 
परत काढत होती 
शेजारी नवरा लॅपटॉप वर काम करत होता 
नराहवुन नवरा म्हणाला अगं दर वेळेस कॅमेरा का पुसतेय 
एकदा तोंड पण पुसून बघ 
लॅपटॉप फुटला.

बायको - आपल्या लग्नाला 10 वर्ष झाली
कसे दिवस गेले कळलेच नाही 
नवरा-अगं दिवस गेले हे जेलरलाच कळते
कैधाला कधीच नाही कळत.
हे पण वाचा-

मराठा आरक्षण | मराठा जातीचा दाखला कसा काढायचा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या